Ganeshotsav 2023: मालेगावात 10 तास मिरवणूक! बारानंतर वाजंत्री बंद; पहाटे पावणेचारला शेवटच्या बाप्पाला निरोप

A picture of the procession and the crowd after the Ganesh Visarjan procession of Ekta Mandal in the city arrived at Mosampool Chowk.
A picture of the procession and the crowd after the Ganesh Visarjan procession of Ekta Mandal in the city arrived at Mosampool Chowk.esakal

Ganeshotsav 2023 : कसमादे परिसरातील दुष्काळाची दाहकता कमी करतानाच दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साही वातावरण निर्माण करून गेला. ‘बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘बाप्पा मोरया रे...’ चा जयघोष, ढोलताशांचा निनाद, गुलाल, कागदी कपट्यांची उधळण व तीन पावलीचा ताल अशा मोठ्या उत्साही वातावरणात शहर व परिसरात लाडक्या गणरायाला हजारो भक्तांनी निरोप दिला.

शहरातील सटाणा नाका भागातील एकता गणेश मंडळाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो गणेशभक्तांनी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

दरम्यान काही मंडळांनी दुपारी चारला तर काहींनी सायंकाळी सहाला मिरवणुकीस सुरवात केली. रात्री बारानंतर वाजंत्री बंद होऊन पहाटे पावणेचारला शेवटच्या बाप्पांचे विसर्जन झाले. (Ganeshotsav 2023 10 hour procession in Malegaon Farewell to last Bappa in morning nashik)

मालेगाव शहरातील सटाणा नाका भागातील एकता मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी झालेली गर्दी
मालेगाव शहरातील सटाणा नाका भागातील एकता मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी झालेली गर्दीesakal

शहरातील प्रसिद्ध मातामठ तालीम संघ, भगवंत तालीम संघ, अमर मंडळ, भारत मंडळ, प्रकाश तालीम संघ, पवन मित्र मंडळ, जय बजरंग तालीम संघ यासह द्याने, कॅम्प भागातील बहुसंख्य गणेश मंडळांमध्ये ढोल, ताशे व तीन पावलीच्या तालावर हजारो तरुण नाचत होते.

गुलालाची उधळण झाल्याने मिरवणूक मार्ग गुलालाने लाल झाला होता. गणेशोत्सव काळात प्रथमच समाधानकारक पाऊस झाल्याने बाप्पा पावला अन्‌ पाऊस आला अशी भावना होती. प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झाल्या.

रात्री बारानंतर ढोल-ताशांचा निनाद बंद करण्यात आला. घोषणांच्या निनादात पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. मिरवणुकांसाठी प्रामुख्याने सजविलेल्या ट्रॅक्टरट्रॉलींचा वापर करण्यात आला.

कॅम्प व महादेव घाट गणेश कुंडावर लहान-मोठ्या तीनशेहून अधिक श्री मूर्तींचे विसर्जन झाले. पहाटे पाऊणेचारला सर्वांत शेवटी भारत गणेश मंडळाच्या श्री मूर्तीचे विसर्जन झाले. मिरवणूक मार्गावर अवलिया मशिदीसह काही ठिकाणी मिरवणुकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

महानगरपालिकेने साकारलेल्या अकरा तात्पुरत्या गणेशकुंडांसह गिरणा नदीपात्र, टेहरे शिवार, सोयगाव चौफुली, रोकडोबा आदी ठिकाणी घरगुती गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन झाले. बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळांनी आपापल्या विभागात वाद्य वाजवून आनंद लुटला.

मुख्य मिरवणूक मार्गावर येईपर्यंत बारा वाजल्याने वाजंत्री बंद करण्यात आली. यानंतर घोषणा देत गणरायाच्या मिरवणुका महादेव घाट गणेशकुंडावर आल्या. पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांना भेटी दिल्या.

जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सविता गर्जे आदींसह विविध पोलिस ठाण्यांचे निरीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

चोख पोलिस बंदोबस्त होता. २५ सीसीटीव्ही कॅमेरे मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. मिरवणुकीच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

A picture of the procession and the crowd after the Ganesh Visarjan procession of Ekta Mandal in the city arrived at Mosampool Chowk.
Ganeshotsav 2023: ‘ज्यूली’च्या गणेशभक्तीने वेधले लक्ष! गणरायाला निरोप देतांना भावूक झाली ज्यूली श्वान

पंचवीसहून अधिक मोठ्या मिरवणुका

मालेगावातील मातामठ, भारत, अमर मित्र मंडळ, भगवंत तालिम संघ, शूरवीर मित्र मंडळ, सावता मंडळ, नवनाथ मंडळ, हिंदू एकता, प्रकाश तालीम संघ, परमात्मा, सिद्धी विनायक, त्रिशूळ मंडळ, मॉर्निंग स्टार, जय बजरंग मंडळ, शक्ती गणेश मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, जय शंकर मंडळ, साईराम मित्र मंडळ, आदर्श सार्वजनिक, जय बजरंग तालीम संघ, जय ज्योती गणेश मंडळ आदींसह पंचवीसहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या विसर्जन मिरवणुका निघाल्या.

एकता मंडळाच्या मिरवणुकीचीच चर्चा

शहरातील एकता मंडळाच्या मिरवणुकीत पुणेरी ढोलपथक, नाशिक ढोलपथक, रशियन बॅंड, इजिप्त तनुरा डान्स, कोळी ग्रुपनृत्य, लेझीम पथक, बाहुबली हनुमान, विराट भोलानाथ, अघोरी पथक, शौर्य पथक, बॅालीवुड पथक, कोल्हापुरी हलगी पथक, आदिवासी पथक, योगा पथक आदी चौदा पथक होते.

या मंडळाची मिरवणूक सुमारे एक किलोमीटर अंतराची होती. मंडळाचे संस्थापक सुनील गायकवाड विविध पथकांना भेटी देत झांज वाजविण्याचा व आदिवासी पथकासमवेत नाचण्याचा आनंद घेत होते.

मंडळाचे शेकडो कार्यकर्ते मिरवणूक यशस्वितेसाठी व मिरवणुकीत कोणी घुसखोरी करू नये, सर्वांना मिरवणूक पाहता यावी यासाठी परिश्रम घेत होते. डमरु, झांज वाजविणाऱ्या आघोरी पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

A picture of the procession and the crowd after the Ganesh Visarjan procession of Ekta Mandal in the city arrived at Mosampool Chowk.
Nashik Ganeshotsav 2023: विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com