Ganeshotsav 2023: भडके कुटुंबाच्या आरासमध्ये ओझरच्या समस्या; घरगुती गणरायाची पंचक्रोशीत चर्चा

Ozar problems raised by the Bhadke family before Ganapati Bappa.
Ozar problems raised by the Bhadke family before Ganapati Bappa.esakal

: ‘ना निवडणूक, ना नगराध्यक्ष, ना नगरसेवक तरीही आमच्या ओझरला आहे नगरपरिषद’, असा संदेश देत येथील भडके कुटुंबाने गणरायाची स्थापना केली आहे.

गणपतीच्या पाठीमागे नगरपरिषदेची इमारत दाखवून पोस्टर्सद्वारे ओझरच्या ज्वलंत समस्या मांडल्या आहेत. (Ganeshotsav 2023 ozar issues in Bhadke family decoration discussion of domestic Ganaraya nashik)

ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपरिषदेत होऊन तीन वर्षे झाले, तरी ओझरकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ते, पाणी, कचरा या महत्त्वाच्या समास्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.

ओझरच्या खराब रस्त्यांमुळे व्यापारावर परिणाम झाला आहे, तसेच कचरा गावाला लागून नदीकाठालाच टाकला जात असून, कचरा डेपोच्या आसपासचा परिसर उर्ग वासाने हैराण झाला आहे.

आता तरी गणराया गावाला समस्यांच्या विळख्यातून सोडवावे, यासाठी आम्ही आमच्या भावना गणपती बाप्पासमोर मांडल्या आहेत, असे रितेश भडके कुटुंबाने सांगितले.

आजी-माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातून करोडो रुपयांचा निधी प्राप्त झाला असला, तरी विकासकामांना मुहूर्त लवकर लागावा, अशी माफक अपेक्षा या वेळी भडके कुटुंबाने व्यक्त केली.

Ozar problems raised by the Bhadke family before Ganapati Bappa.
Pune Ganeshotsav : सर्वाधिक दणदणाट मंडईत

सजावटीत मांडलेल्या व्यथा

-चंद्रावरचे खड्डे बघायचे आ जावो बॉस दिखादूंगा : ओझर बसस्थानक

-दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, हाच आहे ओझरचा इतिहास

-ना नानानानी पार्क ,ना लहान मुलांना खेळायला गार्डन, असे आहे आमच्या ओझरचे राजकारण

-रस्त्यात खड्डे की खड्यात. तूच सांग बाप्पा यात झोल तरी काय?

-गाववाले नेते, आणि बाहेरगाववाले, पण तसेच बाप्पा तूच सांग आता आमच्या ओझरचे होणार कसे?

-मिग विमानाने केले ओझरचे नाव रोशन, पण राजकारण्यांनी केले ओझरकरांचे शोषण

-देव तारी त्याला कोण मारी, बाप्पा तूच आहे आमचा वाली

Ozar problems raised by the Bhadke family before Ganapati Bappa.
Sangli Ganeshotsav : आकर्षक सजावट, लक्षवेधी मूर्ती; पाहा तासगाव, शिराळा, खानापूर, इस्लामपुरातील बाप्पाची झलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com