नाशिक: सायंकाळचे थेंबदार वातावरण... आकाशातून रिमझिम पाऊस ठिपकत होता आणि त्याच वेळी रस्त्यांवर ढोल-ताशांचा नाद गुंजू लागला. गणरायाच्या जयघोषात लोकांचे पाय नकळत ताल धरू लागले. मुले-मुली पावसाच्या सरींना न जुमानता नाचू लागली. कुठे रंगीबेरंगी पताका, कुठे फुलांची आरास, तर कुठे समाजप्रबोधनाचे देखावे... जणू प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक गणरायाच्या स्वागतासाठी सजून निघाला होता.