नाशिक: ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस श्री गणेशोत्सवाला सुरवात होणार असून त्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. मंडळांना परवानगी देण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देतानाच आता गणेशमूर्ती विक्रीसाठी २४ ठिकाणी २७४ मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारले जाणार असून, त्यासाठी ७ ऑगस्टला लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.