नाशिक: चौदा विद्या अन् चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठ गजबजली आहे. बुधवारी (ता.२७) दुपारी दीडपर्यत घरगुती गणरायांची प्राणप्रतिष्ठापनेसाठीचा मुहूर्त असणार आहे. सार्वजनिक मंडळांच्या मंडपात रात्रीपर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करता येईल.