Nashik Ganeshotsav 2023 : गणेशमूर्ती विक्रीसाठी महापालिकेचे 220 स्टॉल्स; या तारखेला जागांचे लिलाव

 Ganesh idols
Ganesh idolsSakal

Nashik Ganeshotsav 2023 : महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या तयारीला सुरवात झाली असून, एक भाग म्हणून 3० ऑगस्टला २२० स्टॉलच्या जागांचा लिलाव विभागीय कार्यालयांमध्ये केला जाणार आहे.

कोरोनामुळे महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती स्टॉलच्या जागांच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नव्हता. (ganeshotsav 220 stall spaces will be auctioned in divisional offices on August 30 by nmc nashik news)

परंतु यंदा उत्सव दणक्यात होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने महापालिकेकडून मूर्ती स्टॉल विक्रीसाठी तयारी सुरू केली आहे.

मूर्ती विक्रीसाठी सहा विभागात १९ ठिकाणी एकूण २२० स्टॉलसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पश्चिम विभागात ५५, पूर्व ११, नाशिक रोड ९०, पंचवटी चार, सिडको ४२, सातपूर विभागात १८ स्टॉल जागांसाठी लिलाव केला जाणार आहे. लिलावात भाग घेणाऱ्यांना प्रत्येक स्टॉलच्या जागेसाठी तीन हजार रुपये अनामत रक्कम आगाऊ भरावी लागणार आहे.

स्टॉलची ठिकाणे-

- पश्चिम विभाग: गोल्फ क्लब इदगाह मैदान ४०, संदीप हॉटेल समोरील मोकळी जागा १०, शिवसत्य मैदान, गंगापूर रोड ५.

- पूर्व विभाग : युनिक मैदानाशेजारी चेतनानगर १०, साईनाथनगर सिग्नल १.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Ganesh idols
Ganeshotsav 2023 : गणेशमूर्ती साकारण्याच्या कामास वेग! मूर्तींच्या दरामध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ

- नाशिक रोड विभाग : जेतवननगर नर्सरीलगत १०, नोट प्रेससमोर के. एन. केला शाळेशेजारी ३०, नाट्यगृहाच्या आरक्षित जागेत, जेल रोड ५०.

- पंचवटी विभाग : म्हसरूळ गावाजवळ वैदुवाडीलगत २, पेठ रोड आरटीओ ऑफिससमोरील मोकळी जागा २.

- सिडको : जुने शॉपिंग सेंटर लेखानगर ६, पवननगर मैदान १५, राजे संभाजी स्टेडिअम १५, गामणे ग्राउंड ६.

- सातपूर विभाग : खंडेराव महाराज मंदिर सातपूर गाव १०, दत्तमंदिर रोड कॉर्नर अंबड लिंक रोड २, मांगल्या पेट्रोलपंपासमोर लिंक रोड २, ध्रुवनगर बसस्टॉप २, मोतीवाला कॉलेज समोर २.

 Ganesh idols
Ganeshotsav 2023: पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना प्राधान्य! ग्राहकांकडून बुकिंगला सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com