नाशिक: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंगळवार (ता.२) पासून पाच दिवस मध्यरात्रीपर्यंत आरास व देखाव्याचा आनंद घेता येणार आहे. ५ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत नाशिककरांसह पंचक्रोशीतील भाविकांना आरास देखावे पाहता येतील, तर शनिवारी (ता. ६) मध्यरात्रीपर्यंत विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटता येणार आहे.