नाशिक: मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालय, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने गणेशोत्सवात श्रीगणेशा आरोग्याचा समुदाय आरोग्य शिबिर घेण्यात येईल. जिल्ह्यात २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात ४२ सार्वजनिक गणेश मंडळांत होणाऱ्या शिबिरात मोफत आरोग्य चिकित्सा व उपाचारार्थ मार्गदर्शन करण्यात येईल. गरजू रुग्ण व नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार मंजूषा घाटगे यांनी केले.