Nashik News : गणेशवाडी भाजीबाजार इमारत ओस; इमारतीत सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधी

As only vendors are not sitting in the Ganeshwadi vegetable market building, beggars and vagrants have taken over the building.
As only vendors are not sitting in the Ganeshwadi vegetable market building, beggars and vagrants have taken over the building. esakal

Nashik News : गणेशवाडी भाजीबाजार इमारतीत महापालिकेकडून कोरोना कालावधीत भाजी विक्रेत्यांना जागा देण्यात आली होती.

हे भाजी विक्रेते जोपर्यंत या ठिकाणी विक्री करीत होते तोपर्यंत याठिकाणी स्वच्छता पाहायला मिळत होती. (Ganeshwadi vegetable building unsanitary everywhere and bad smell has spread nashik news)

परंतु अलीकडे बहुतांश विक्रेत्यांनी आपला गाशा गुंडाळला असल्याने, या इमारतीचा ताबा पुन्हा एकदा भिकारी, वाटसरू, गर्दुल्ले यांनी मिळवला आहे. सद्यःस्थितीत या इमारतीत सर्वत्र अस्वच्छता झाली असून, दुर्गंधी पसरली आहे. मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोनाकाळात या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना ठराविक अंतर ठरवून देत जागा दिली होती. तेव्हा शेकडो भाजी विक्रेते या ठिकाणी भाजी विक्री करण्यासाठी आले होते. मनपानेदेखील ही इमारत चकाचक करून व डागडुजी करूनही इमारत विक्रेत्यांना उपलब्ध करून दिली होती.

परंतु अलीकडच्या काळात पंचवटी विभागात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बसून भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली असून, भाजी बाजारदेखील विविध ठिकाणी भरवले जात आहेत. नागरिकांना घराजवळ भाजी मिळत असल्याने, गणेशवाडी भाजीबाजार इमारत ओस पडू लागली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

As only vendors are not sitting in the Ganeshwadi vegetable market building, beggars and vagrants have taken over the building.
Nashik News : टाळकुटेश्वर नदीपात्रास मिळणार पुनर्वैभव! ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर

सद्यःस्थितीत या ठिकाणी जेमतेम दोन ते चार भाजी विक्रेते विक्री करीत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने, भिकारी, वाटसरू, गर्दुल्ले व टवाळखोर यांनी या इमारतीचा ताबा मिळवला आहे. इमारतीत सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीमुळे या इमारतीत फेरफटका मारणे देखील मुश्कील झाले आहे.

मनपा प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ही भाजीबाजार इमारत उभी केली. परंतु वापराविना ही इमारत धूळ खात पडून आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळा व कोरोना कालावधी सोडल्यास या इमारतीचा वापर झालेला नाही.

सद्यःस्थितीत इमारतीत असलेले लोखंडी दरवाजे चोरून नेले असल्याचे समोर आले आहे. तसेच छतावर अनेक ठिकाणी काचेचे तावदानं बसविण्यात आले आहेत. मात्र येथील काचा फोडण्यात आल्याने मनपा प्रशासनाच्या मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे.

As only vendors are not sitting in the Ganeshwadi vegetable market building, beggars and vagrants have taken over the building.
NIMA Power Exhibition : इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री भुसे

सुविधा दिल्यास समस्या होईल दूर

शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या मेनरोड परिसरात अनेक वर्षांपासून भरणारा फुलबाजार काही महिन्यांपासून गणेशवाडी भाजीबाजार इमारतीच्या शेजारी भरतो आहे. सुरवातीला या ठिकाणी फूल विक्रेत्यांनी विरोध केला. परंतु सद्यःस्थितीत हा फूल बाजार नित्यनेमाने व सुस्थितीत भरविला जात आहे.

असे असताना भाजी विक्रेत्यांना मनपा प्रशासनाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिली तर भाजी विक्रेत्यांनी ही इमारत फुलून जाईल यात शंका नाही. शहरासह परिसरात विविध ठिकाणी अनधिकृत भाजी बाजार व भाजीविक्रेते बसत आहेत. यामुळे मनपाच्या गणेशवाडी भाजीबाजार इमारतीत कोरोनाकाळात आलेल्या विक्रेत्यांवर विपरीत परिणाम होत आहे.

म्हणूनच येथील बहुतांश भाजी विक्रेत्यांना अन्यत्र विक्री करण्यासाठी जावे लागले असल्याचे वास्तव समोर आले आहे. मनपा प्रशासनाने जर अनधिकृत भरणाऱ्या भाजीबाजारांवर कारवाई केली तरच पुन्हा गणेशवाडी भाजीबाजार इमारतीत अन्यत्र गेलेले भाजीविक्रेते पुन्हा येण्याची शक्यता असल्याचे येथील काही विक्रेत्यांनी सांगितले.

As only vendors are not sitting in the Ganeshwadi vegetable market building, beggars and vagrants have taken over the building.
Sinnar Unseasonal Rain : सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com