NIMA Power Exhibition : इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री भुसे

NIMA office bearers welcoming Guardian Minister Dada Bhuse
NIMA office bearers welcoming Guardian Minister Dada Bhuseesakal

NIMA Power Exhibition : १९ ते २२ मेदरम्यान निमा कार्यालयासमोरील आयटीआय, सातपूर येथील मैदानावर, निमा आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (महाराष्ट्र शासन) यांच्या सहकार्याने आयोजित ‘निमा पॉवर २०२३’ औद्योगिक प्रदर्शनात सहभागासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्टॉनिक्स, आयटीसह संलग्न विविध उत्पादक व व्यावसायिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे.

उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे तसेच नाशिकला इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक क्लस्टर व्हावे या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. (Guardian Minister Bhuse statement at NIMA Power Exhibition Striving for Electrical Electronic Cluster nashik news)

महिन्याभरात जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे. सदर प्रदर्शन म्हणजे विद्युत क्षेत्राचा कुंभमेळा ठरेल, असा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सचिव राजेंद्र आहिरे व प्रदर्शन चेअरमन मिलिंद राजपूत यांनी व्यक्त केला.

निमा पॉवर प्रदर्शन या वेळी दशकपूर्ती वर्ष साजरे करीत असून, केंद्रीय विद्युत संशोधन संस्था सीपीआरआयच्या नाशिक शाखेच्या गुंतवणुकीच्या यशानंतर इलेक्ट्रॉनिक्स तथा इलेक्ट्रिकल क्लस्टर नाशिकला मंजुरीसाठी निमा व एमआयडीसीचे सामूहिक प्रयत्न सुरु आहेत.

त्यामुळे सदर प्रदर्शनाला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्युत क्षेत्रातील मोठे प्रकल्प नाशिकमध्ये येण्याच्या दृष्टीने निमा पॉवर प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल, अशी भावना सर्व प्रायोजकांनी व्यक्त केली आहे.

आतापर्यंत टीडीके, स्मार्ट सोल्यूशन लि.थायसन, एचएएल, आकांक्षा पॉवर इन्फ्रा, नेक्स्ट स्टेप मल्टी पार्किंग, नारखेडे उद्योग, डब्ल्यूआर सोलर, मोंक ऑटोमेशन, बेदमुथा ग्रुप, अनुप्रिया इंडस्ट्रीज सह अनेक उद्योग प्रायोजकत्वात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NIMA office bearers welcoming Guardian Minister Dada Bhuse
The Kerala Story Free Show : सकल हिंदू समाजातर्फे ‘द केरला स्टोरी’ दाखविला मोफत

ऊर्जा बचत उपकरणे, विद्युत सुरक्षा, रोबोट, सोलर, एलईडी, ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रॉमेक्निक लिफ्ट, क्रेन, यूपीएस, स्टॅबिलायझर, आयओटी तंत्रज्ञानाची उपकरणे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आदींसह एचएएलचे इंडीजीनीयस सुट्या भागांसह एअरक्राफ्ट हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

प्रदर्शन यशस्वितेसाठी निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर, हर्षद ब्राह्मणकर, नितीन वागस्कर, शशांक मणेरीकर, कैलास पाटील, गोविंद झा, संदीप भदाणे, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी, संजय राठी,

हेमंत खोंड, वैभव जोशी, संजय सोनवणे, जितेंद्र आहेर, मनीष रावळ, श्रीकांत पाटील, रवी श्‍यामदासानी, एस. के. नायर, सुधीर बडगुजर, रावसाहेब रकिबे, प्रशांत जोशी, जयदीप राजपूत, मंगेश काठे, वेंकटेश मूर्ती, परमानंद नेहे, विश्र्वास शिंपी, बाळासाहेब जाधव, किरण लोणे, विश्वजित निकम आदी प्रयत्नशील आहेत.

मुख्यमंत्री उद्‌घाटनास येणार!

उद्योग मंत्री उदय सावंत व पालकमंत्री दादा भुसे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करीत उद्‌घाटनासाठी उपस्थित राहण्याचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी आणण्याचे आश्वासन दिले आहे.

NIMA office bearers welcoming Guardian Minister Dada Bhuse
Autothon 2023 : व्रूम...व्रूम...च्या आवाजाने तरुणाई रोमांचित! ऑटोथॉन 2023 ला दमदार आणि उत्साहात सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com