Monsoon
sakal
नाशिक: दोन दिवसातील संततधारेने ९८ टक्के भरलेल्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला अन् पुराचे पाणी थेट भांडी बाजारापर्यंत पोहोचले. वाढत्या पाणीपातळीमुळे धास्तावलेल्या नदीकाठच्या नागरिकांत पुन्हा एकदा ९ सप्टेंबर १९६९च्या म्हणजे तब्बल ५६ वर्षांपूर्वींच्या स्मृतींना उजाळा मिळाला.