Nashik Water Cut: दिवाळीच्या सुरवातीलाचं शहरात ‘पाणीबाणी’; गंगापूर धरण थेट जलवाहिनीला गळती

 Water scarcity
Water scarcityesakal

Nashik Water Cut : जमिनीची लेव्हल करताना जेसीबीचा फटका पाइपलाइनला बसल्याने शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाऱ्या १३०० मिलिमीटर व्यासाच्या गंगापूर धरण थेट जलवाहिनीतून गळती सुरू झाली आहे.

यामुळे सातपूर व पश्चिम भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. (Gangapur dam started leaking directly from channel nashik news)

गंगापूर धरणावर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पंपिंग स्टेशन उभारले जात आहे. शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होऊन थेट जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो.

बुधवारी सकाळी जलशुद्धीकरण केंद्रापासून काही अंतरावर थेट जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली. जवळच्या परिसरात खासगी जागा लेव्हल करताना जेसीबीचा फटका बसल्याने जलवाहिनी फुटली. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा बंद करण्यात आले.

यामुळे सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८, ९, १०, ११, तसेच पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ व १२ या प्रभागांमधील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी दहापासून या प्रभागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. गुरुवारी(ता. ९) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (ता. १०) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

...या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

 Water scarcity
Nashik Drought News: जिल्ह्यात अर्धा डझन तालुक्यांत यंदा दुष्काळाचे ‘दीप’; टंचाई आराखड्याला लागेना मुहूर्त

सातपूर विभाग ः प्रभाग क्रमांक ८ मधील बळवंतनगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर, रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परिसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकरनगर, पाइपलाइन रोड, काळेनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंदनगर, निर्मल कॉलनी, काळेनगर, शंकरनगर, चित्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर. प्रभाग क्रमांक ९ मधील ध्रुवनगर जल कुंभ परिसर, ध्रुवनगर, मोतीवाला कॉलेज परिसर, हनुमाननगर, संभाजीनगर, शिवशक्ती कॉलनी, प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तुनगर, विवेकानंदनगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजीनगर, राधाकृष्णनगर, प्रभाग ११ मधील प्रबुद्धनगर.

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ मधील नहुष जलकुंभ, नरसिंहनगर, पूर्णवादनगर, अरिहंत हॉस्पिटल परिसर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा आनंदनगर, डी. के. नगर, शांतिनिकेतन सोसायटी परिसर, आयचितनगर परिसर, चैतन्यनगर परिसर, सहदेवनगर परिसर, पंपिंग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर. रामराज्य जलकुंभ- सावरकरनगर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल परिसर, जहान सर्कल परिसर, डिसूझा कॉलनी, शिवगीरी सोसायटी, कॉलेज रोड परिसर, एस. टी. कॉलनी परिसर, शहीद चौक परीसर. प्रभाग १२ मधील यशवंत कॉलनी, कल्पनानगर, डिसूझा कॉलनी, कॉलज रोड व इतर परिसर.

 Water scarcity
Diwali 2023 : पॅकिंग सुकामेवा, फॅन्सी चॉकलेटची चलती; वस्तूंच्या किमतीत 8 टक्के वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com