निखिल रोकडे : नाशिक- गंगापूर धरणातील पाणी हे नियोजित वेळेपेक्षा जवळपास दोन तास लवकर रामतीर्थात पोहोचणार आहे. यावर पटकन विश्वास बसत नाही ना... पण, जलसंपदा विभागातर्फे असा बंधारा उभारण्याचे प्रस्तावित आहे. आनंदवली येथे गोदापात्रात हा बंधारा साकारला जाईल. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रबर (बलून) बंधारा बांधण्यात येणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना शाहीस्नानासाठी रामतीर्थ व त्या खालील घाटांवर आवश्यक पाणीपातळी राखणे यामुळे त्वरित शक्य होईल.