Gangapur Dam
sakal
नाशिक: शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पूर्ण क्षमेतेने भरल्यानंतर सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोंबर महिन्यात जलपूजन करण्याची परंपरा आहे. परंतु यंदा परंपरा मोडीत निघणार असून, जलपूजनाचा विषय प्रशासनाकडून चर्चेला आणला जात नाही तर दुसरीकडे अद्याप पाणी आरक्षणाचीदेखील मागणी नोंदविण्यात न आल्याने नेमके धरणातून पाणी किती उपसायचे असा प्रश्न पाणीपुरवठा विभागासमोर निर्माण झाला आहे.