नाशिक- महापालिकेच्या गंगापूर थेट पाइपलाइन योजनेत महासभेची परवानगी न घेताच अटी व शर्ती बदलण्यात आल्याच्या प्रकरणात गंभीर बाब समोर आली असून, त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे. यात सहा मीटर लांबीचे पाईपऐवजी बारा मीटर रुंदीचे पाईप घेताना जुने स्टॉकमधील पाईप खरेदी करून जादा दर लावण्यात आल्याचा संशय आहे.