Nashik Crime: भेळविक्रेत्या वाघ खून खटल्यात सराईत गुंड कुंदन परदेशीला जन्मठेप; 7 आरोपींना शिक्षा

murder case
murder caseesakal

Nashik Crime : पंचवटीतील हनुमान वाडी परिसरात क्रांतीचौकामध्ये भेळविक्रेता सुनील वाघ याची दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी सराईत गुंड कुंदन परदेशी यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

तर, खूनाच्या कटातील चार आरोपींना सात वर्षे आणि मारहाणीत तिघांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचप्रमाणे, खूनाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातील अजय बागुलसह १० जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

दरम्यान, न्यायालयाने सरकारी पंचांसह १५ फितूर झालेल्या साक्षीदारांविरोधात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी रितसर कारवाईचे आदेशही दिले आहेत. (Gangster Kundan Pardeshi Gets Life Imprisonment Punishment for 7 accused Nashik Crime)

क्रांती चौकात सुनील वाघ, हेमंत वाघ आणि मंदा वाघ यांचा भेळव्रिकीचा गाडा होता. २७ मे २०१६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कुरापतीतून आरोपींनी वाघ बंधूंवर हल्ला चढविला.

यात सुनील वाघ यांचा खून झाला होता तर हेमंत वाघ गंभीररित्या जखमी होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसात परदेशी टोळीतील २१ जणांविरोधात खून, प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात तिघे विधिसंघर्षिक बालकांचा समावेश होता. याप्रकरणात तत्कालिन पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये परदेशी टोळीविरोधात मोक्काही लावण्यात आला होता.

मात्र नंतर मोक्का रद्द झाला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक व्ही. झोनवाल यांनी केला होता.

सदरचा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश बी.व्ही. वाघ यांच्यासमोर चालला. यात प्रत्यक्ष साक्षीपुराव्यांनुसार न्या. वाघ यांनी मुख्य आरोपी कुंदन परदेशी यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

तर, खूनाच्या कटातील सहभागी राकेश कोष्टी, जयेश दिवे, व्यंकटेश मोरे, किरण नागरे यांना प्रत्येकी ७ वर्षे सश्रम कारावास आणि मारहाणीच्या गुन्ह्यात अक्षय इंगळे, रवींद्र परदेशी, गणेश कालेकर यांना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. पंकज चंद्रकोर यांनी ३४ साक्षीदार तपासले. यातील १५ साक्षीदार फितूर झाले. याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

murder case
Dhule Crime News : शिरपूरमध्ये घरफोडीत 5 तोळे दागिने लंपास

आई-भावाची साक्ष महत्त्वाची

सुनील वाघ खूनखटल्यात भाऊ हेमंत वाघ व आई मंदा वाघ हे प्रत्यक्ष साक्षीदार होते. न्यायालयात त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

त्याचप्रमाणे, मयत सुनील वाघ यांच्या रक्ताचे डाग मुख्य आरोपी कुंदन परदेशी याच्या अंगावरील कपड्यावर मिळून आले होते. कुंदन परदेशी अटक केल्यापासून आजपर्यंत कारागृहातच आहे. तर, उर्वरित आरोपी जामीनावर बाहेर होते.

फितूरांवर कारवाईचे आदेश

वाघ खूनखटल्यात ३४ साक्षीदार तपासण्यात आले. परंतु यातील सरकारी दोन पंचासह १५ साक्षीदार फितूर झाले. त्याचा फायदा काही आरोपी निर्दोष मुक्त होण्यात झाला. याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करतानाच, फितूर झालेल्या १५ साक्षीदारांना नोटीसा बजावितानाच चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या कारवाईमध्ये साक्षीदार फितूर झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना किमान ७ वर्षे कारावासाची शिक्षा आहे. विशेषत: फितूर साक्षीदारांमध्ये दोन सरकारी पंच असून, ते महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आहेत.

murder case
Jalgaon Crime News : महिलेवर अत्याचार करणाऱ्यास 7 वर्षे सश्रम कारावास

बागुलसह १० निर्दोष

शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांचे पुतणे व श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल हादेखील वाघ खून खटल्यात कट रचल्याच्या आरोपात आरोपी होता. परंतु सबळ पुराव्याअभावी बागुल यांच्यासह १० जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.

तर, सात वर्षे शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांमध्ये भाजपाच्या माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे, तर राकेश कोष्टी याच संघटनेचा पदाधिकारी असून, यांच्याविरोधात खून, खूनाच प्रयत्नांसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.

दोन महिन्यांपूर्वी राकेश कोष्टी याच्यावर सिडकोत जया दिवे याच्या टोळीने गोळीबार केला होता. यात कोष्टी थोडक्यात बचावला आहे.

"वाघ खून खटल्यात निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल करण्यात येणार आहे. तसेच, फितूर झालेल्या १५ साक्षीदारांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई केली जाणार आहे."

- ॲड. पंकज चंद्रकोर, विशेष सरकारी वकील, नाशिक.

murder case
Belgaum Crime : मतभेदामुळं जवानाच्या पत्नीची सात वर्षांच्या चिमुरडीसह गळफास घेऊन आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com