अंबडच्या दत्तनगरमध्ये गुंडांचा धिंगाणा; रहिवाशांच्या घरांवर दगडफेक, Video Viral

viral video
viral videoesakal

नाशिक : अंबड परिसरातील दत्तनगरमध्ये रविवारी (ता. ११) रात्री गुंडांच्या टोळक्याने हातात लाकडी दांडके घेत परिसरातील रहिवाशांच्या घरांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामुळे या परिसरातील गुंडांच्या दहशतीमुळे पोलिसांचा वचक राहिलेला नसून, नागरिकांच्या तक्रारींकडे पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. (Gangster rampage in Ambad Dattanagar Stone pelting Video Viral Nashik Latest Marathi News)

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या गुंडगिरीबाबत पोलीसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या तक्रारी अंबड पोलिसांकडून दाखल करून घेतल्या जात नाहीत, वा तक्रार अर्ज घेऊनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याबाबत उघडउघड बोलले जाते आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, रविवारी (ता. ११) अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर, दातीरनगर या परिसरात १५-२० जणांच्या टोळके हे हातात लाकडी दांडगे घेऊन परिसरातील घरांवर दगडफेक करीत असल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.

viral video
Pitru Paksha : पितरांना नैवेद्य अन् काकस्पर्शाची प्रतिक्षाच...!

यासंदर्भात त्रस्त नागरिकांनी परिसरातील गुन्हेगारांविरुद्ध अंबड पोलिसात लेखी तक्रारी दिल्या आहेत. परंतु, अद्यापपर्यंत त्यासंदर्भात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असून, पोलिसांचा वचकच राहिलेला नाही असेच दिसून येत आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष

अंबड हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुंडांची दहशत माजविली जात आहे. याबाबत अंबड पोलिसांकडून सोईस्कररीत्या दुर्लक्ष होते आहे. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर हद्दीत रात्रीची गस्ती पोलिस अधिकारी-कर्मचारी घालत असताना सदरचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.

viral video
श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती : आदिमाया ते नाथ अन् संत वाङ्‍मय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com