चुंचाळेत सराईत गुंडांचा धिंगाणा; गुन्हेगाराने केला रहिवाशी महिलेचा विनयभंग

women molestation news
women molestation newsesakal

नाशिक : अंबड परिसरातील चुंचाळे शिवारास असलेल्या घरकुल योजनांच्या बिल्डिंगखाली सराईत गुन्हेगारांनी धिंगाणा घालत असल्याने त्यांना रोखणाऱ्या रहिवाशी महिलेचा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाने विनयभंग केला. तसेच, जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी अंबड पोलिसात चौघांविरोधात विनयभंगांसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अंबह पोलिसांनी अटक केली आहे. (Gangster rampage in Chanchal criminal molested woman Nashik Latest Marathi News)

उध्दव उर्फ टकल्या अशोक राजगिरे (२०, रा. बिल्डिंग सी-२, चुंचाळे घरकुल, अंबड), लक्ष्मण उर्फ लक्ष्या राजेंद्र कोळी (२०, रा. बिल्डिंग बी-८, चुंचाळे घरकुल, अंबड), भूषण सुरेश सिंग (३३, रा. बिल्डिंग ३३, रा. चुंचाळे घरकुल, अंबड), आदित्य उर्फ आद्या पांडे अशी संशयितांची नावे आहेत.

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (ता.३०) चौघे संशयित हे चुंचाळे घरकुल योजनेच्या बिल्डिंग नं. ५ च्या खाली आरडाओरडा करीत धिंगाणा घालत मोटारसायकलींची तोडफोड करीत होते. त्यावेळी पीडित महिलेने संशयितांना मोटारसायकलींची तोडफोड का करतो म्हणून जाब विचारला असता, संशयित टकल्या व लक्ष्या यांनी पीडित महिलेला मारहाण करीत, सराईत गुंड टकल्यान याने महिलेचा ब्लाऊज फाडून आमच्या नादाला लागतेस काय असे म्हणत विनयभंग केला.

women molestation news
Bribe Crime : कळवण प्रकल्पातील 2 कनिष्ठ लिपिक निलंबित

यावेळी पीडितेचा मुलगा बचावासाठी आला असता, संशयितांनी त्यासही मारहाण केली. तसेच संशयित टकल्या याने त्याच्याकडील चाकू काढून, मी मर्डर केलेला असून, अजून एक मर्डर करीन. माझ्या नादाला लागू नका असे म्हणून जमलेल्या रहिवाशांना धमकावत परिसरात दहशत पसरवली.

याप्रकरणी अंबड पोलिसात विनयभंगासह मारहाण व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी टकल्या, लक्ष्या आणि भूषण या तिघांना अटक केली असून, चौथा संशयित आदित्य पसार झाला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक कातकडे हे करीत आहेत.

संशयित सराईत गुंड

सदरील गुन्ह्यातील गुन्हेगार हे सराईत गुंड असून त्यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. उद्धव उर्फ टकल्या अशोक राजगिरे याच्याविरोधात घरफोडी, चोरी, लुटमारीसह आर्मॲक्टचे गुन्हे दाखल आहेत. तर, लक्ष्मण उर्फ लक्ष्या राजेंद्र कोळी याच्याविरोधात १३५ अन्वये तर, भूषण सिंगविरोधात अपहरण व बलात्कारासह पोस्कोअन्वये गुन्हे दाखल आहेत.

women molestation news
सिडकोत 112 मंडळांकडून गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com