नाशिक: गणेशोत्सवात दरवर्षी गणपतीची गाणी लोकप्रिय होतात. रेडिओ, ऑडिओ कॅसेट, सीडी प्लेअरपासून ब्लूटूथ स्पीकरपर्यंतचा प्रवास झाल्यानंतर आता डिजिटल माध्यमामुळे संगीतकार आणि गायकांसाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. गाणी सादर करण्यासाठी मोठ्या प्लॅटफॉर्मची गरज राहिलेली नाही. स्वतःच्या यु-ट्यूब चॅनेलवर गाणी अपलोड केली तरी प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. यंदाच्या गणेशोत्सवात नाशिकचा गायक हर्षवर्धन वावरे (मन धागा धागा जोडते नवा फेम) यांनी तब्बल बारा गणपती गाणी विविध प्लॅटफॉर्मवर सादर केली आहेत.