गृहिणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

गृहिणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
Published on: 
गणपतीनगरात महिलेची सोनसाखळी हिसकावली ------ दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांचे कृत्य सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : रस्त्याने जात असलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपयांची, २० ग्रॅमची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना गणपतीनगरातील सुमन रेसिडन्सीजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. लक्ष्मीबेन शंकरलाल पटेल (वय ७२, रा. प्लॉट क्रमांक ९, राज केशर बंगलो, गणपतीनगर) नेहमीप्रमाणे सायंकाळी घराबाहेर पडल्या होत्या. रस्त्याच्या कडेने त्या अटल हॉस्पिटलकडे जात असताना, समोरून दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने पटेल यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या पटेल यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरट्यांच्या हातात सोनसाखळी आली होती. दोघांनी दुचाकीवर धूम ठोकली. सोनसाखळी सुमारे २० ग्रॅमची असून, तिची किंमत अंदाजे ७० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लक्ष्मीबेन पटेल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे व सहायक निरीक्षक अंकुश वारुंगसे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दिवसा वर्दळीच्या परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः ज्येष्ठ महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com