NMC News : स्मार्टसिटीच्या हरितक्षेत्रावर कचऱ्याचे ढीग! नाशिक बनतंय डेब्रिज सिटी

Drabries dumped on vacant plot in Hanumanwadi area.
Drabries dumped on vacant plot in Hanumanwadi area. esakal

NMC News : बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्पाला मुहूर्त मिळत नसल्याने शहराची वाटचाल डेब्रिज सिटीकडे होत आहे. विशेष म्हणजे स्मार्टसिटींतर्गत हरित क्षेत्र उभारण्यासाठी ज्या जागेची निवड केली होती, त्या जागेवर आता डेब्रिजचे ढीग दिसू लागल्याने डेब्रिज सिटीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याचा आग्रह धरलेल्या महापालिका समोर डेब्रिजचे ढीग संपविण्याचे आव्हान आहे. शहराचा विस्तार होत असताना प्रदूषणात वाढ होत आहे. त्याला कारण म्हणजे पायाभूत सुविधांची कमतरता ठरताना दिसत आहे. (Garbage heaps on green area of ​​Smart City Nashik becoming debris city nmc action time nashik news)

हनुमानवाडी परिसरातील रिकाम्या भुखंडावर टाकलेले ड्रेब्रीज
हनुमानवाडी परिसरातील रिकाम्या भुखंडावर टाकलेले ड्रेब्रीजesakal

c. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये याच कारणावरून पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याचा नाशिकचा मान हुकला.

त्या पार्श्वभूमीवर मलबा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु दोनदा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना घर बांधणीची परवानगी देताना मलबा उचलण्याचे दर वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासाठी विभागीय पातळीवर टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याचा, तसेच एका टनासाठी ८०० रुपये दर निश्‍चित करण्यात आला. विभागीय स्तरावर दोन गाड्या उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले.

परंतु प्रत्यक्षात योजना अमलात आली नाही. कचरा डेपोमध्ये बांधकामाचा मलबा टाकता येणार नसल्याने तुर्तास बंद पडलेल्या खदाणी, विहिरींमध्ये हा मलबा टाकण्याचादेखील निर्णय घेण्यात आला.

बांधकाम साइटवर मलबा आढळल्यास दहा पट दंडाची आकारणी केली जाणार होती. परंतु, दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने स्मार्टसिटीची वाटचाल डेब्रिज सिटीकडे होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Drabries dumped on vacant plot in Hanumanwadi area.
National Lok Adalat : दाखलपूर्व 14 हजारांवर प्रकरणे निकाली! जिल्हाभरात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून निपटारा

येथे टाकले जाते डेब्रिज

- पंचवटी अमरधाम समोर.
- नाशिक अमरधाममागील जागा.
- पंचवटी विभागातील धन्वंतरी लॉन्स मागील जागा.
- गोदावरी व नासर्डी नदी किनारा.
- वडाळागाव परिसर.
- पाथर्डी गाव.
- औरंगाबाद महामार्ग, मुंबई- आग्रा महामार्ग.
- टाकळी रोड (हॉटेल मिरची मार्गे).
- टाकळी सिव्हरेज पंप परिसर.

Drabries dumped on vacant plot in Hanumanwadi area.
Mahavitaran News : अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच! महावितरणचे ग्राहकांसाठी स्पष्टीकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com