Crime
sakal
नाशिक: युद्धामुळे गॅस सिलिंडरची टंचाई भेडसावत असतानाच, सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस एरियात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात घरगुती गॅस सिलिंडर भरून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेत असतानाच छापा टाकून टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दोन ट्रक, तीन छोटा हत्ती या वाहनांसह भरलेल्या व रिकामे गॅस सिलिंडर असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, एकीकडे शहरात ग्राहकांना आठवडाभर उशिराने गॅस सिलिंडर उपलब्ध होत असताना दुसरीकडे मात्र गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे कारवाईमुळे उघडकीस आले आहे.