Gaurav Bhusnar
sakal
पिंपळगाव वाखारी: स्पर्धा परीक्षांत सातत्य, जिद्दीच्या बळावर शिखर गाठता येते, हे गौरव धर्मा भूसनर याने सिद्ध करून दाखवले आहे. स्पर्धा परीक्षेच्या आतापर्यंत वेगवेगळ्या दहा महत्त्वाच्या पदांवर निवड झाल्यानंतर, अखेरीस त्याची पोलिस उपअधीक्षक या पदावर निवड झाली आहे. यानिमित्ताने गौरवचे सप्तशृंगगड या मामाच्या गावी त्याचा सत्कार करण्यात आला.