नाशिक: गणपतीच्या आगमनानंतर उत्सुकता लागली आहे ती गौराईंच्या आगमनाची. माहेरवाशीणी ज्येष्ठा, कनिष्ठा बाळांसह भरपूर लाड करवून घेण्यासाठी रविवारी (ता. ३१) माहेरपणाला येणार असल्याने दहिपूलावर गुरूवारी (ता. २८) दिवसभर गौरींचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी प्रचंड गर्दी झाली होती.