
Gautami Patil : 'त्या' व्हायरल व्हिडिओवर गौतमी पाटील पहिल्यांदा बोलली! म्हणाली...
नाशिक : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत एका २६ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिस कारवाई करत आहेत. महिला आयोगाने देखील या प्रकरणात लक्ष घातले असून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
गौतमी पाटील आज नाशिकमध्ये आहे. कार्यक्रमापूर्वी तिने माध्यमांशी संवाद साधला. मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचे प्रेम मला मिळत आले आहे. लोकांची मला साथ आहे. या गोष्टीचा मला अभिमान वाटतोय.
व्हायरल व्हिडिओवर गौतमी म्हणाली, या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे. याप्रकरणी मी जास्त बोलणार नाही. महिला आयोगाने देखील याची दखल घेतली, याचे मला चांगले वाटले. रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली. त्यांनी ताबडतोड कारवाई करण्याचे सांगितले त्यामुळे मला छान वाटले.
गौतमी पाटील वेगवेगळ्या ठिकाणी लावणी नृत्य सादर करते. एखाद्या स्टारप्रमाणेच तिची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग आहे. एका कार्यक्रमात गौतमी परफॉर्मन्सपूर्वी कपडे बदलत होती, तेव्हा कोणीतरी तिचा व्हिडिओ शूट केला होता. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ट्विटरवर पोस्ट केली होती. त्यांनी पोस्टमध्ये सांगितले की, आयोगाने पोलिसांना महिलांवर होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करण्यास सांगितले आहे.