Ber Fruit : गावरान बोरे लयभारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ber Fruit

Ber Fruit : गावरान बोरे लयभारी!

नरकोळ (जि. नाशिक) : हिवाळ्याच्या सुरवातीला रानात, तसेच शेतातील बांधावर सहज उपलब्ध होणारी गावरान बोरे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वाना आवडते फळ म्हणून परिचित आहे.

रोजच्या आठवडेबाजारांमध्ये विक्रीसाठी बोरे दाखल झाली असून, ग्राहकांची फळ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यानिमित्त बोरे विक्री करणाऱ्या महिलांना सहज रोजगार उपलब्ध होतो. खायला रुचकर आणि पाहताच क्षणी जिभेला पाणी आणणारी बोरे जीवनसत्वांचे भांडार असतात. (gavran ber fruit arrived at market in winter season nashik news)

हेही वाचा: Crop Fire Incident : शॉर्ट सर्किटमुळे 30 क्विंटल मका खाक; 3 ट्रॉली चारा खाक

गावरान बोराचे असे आहेत गुणकारी

बोरे खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. यात असणाऱ्या अँटी-ऑक्सीडेंट्समुळे लिव्हर संबंधित समस्या दूर होते, तसेच त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठीही बोरे खाणे फायदेशीर ठरते. बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व, ‘अ’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असते. हे घटक रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट बनवितात.

बोरे खाल्ल्याने त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. यामध्ये अँटी-ऐजिंग तत्त्व असतात आणि यामुळे त्वचा चमकदार, चिरतरुण राखण्यास मदत होते. बद्धकोष्टची समस्या असेल, तर बोरे खाणे फायद्याचे असते. बोरे पचनक्रिया चांगली बनविण्यात मदत करतात. बोरांमध्ये मुबलक प्रमाणात कँल्शियम आणि फॉस्फोरस असते. हे दात आणि हिरड्यांना मजबूत बनवण्याचे काम करते.

कर्करोगाला प्रतिकार करणा-या पेशी वाढवण्याचे काम बोरं करतात. ऐन दिवाळीच्या सुट्टीत गावरान बोरे उपलब्ध होतात. त्यामुळे हा रानमेवा खाण्याचा आनंद वेगळाच असतो यामुळे सुट्टी कोठे जाते कळत नाही असे केरसाणेतील अर्नव अहिरे याने सांगितले.

हेही वाचा: Monkey at Railway Station : मनमाड रेल्वेस्थानकावर माकडाच्या मर्कटलीला!

टॅग्स :NashikFruit cropHoliday