Monkey at Railway Station : मनमाड रेल्वेस्थानकावर माकडाच्या मर्कटलीला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A monkey sitting at a railway station.

Monkey at Railway Station : मनमाड रेल्वेस्थानकावर माकडाच्या मर्कटलीला!

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर बुधवारी (ता. २) माकडाचे दर्शन झाल्याने सर्वांच्याच नजरा मर्कट लीला बघण्यात खिळल्या होत्या. नंतर त्यांच्या माकड उड्या सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत माकडाचा तिकीट घराजवळ वावर होता, तोपर्यंत तिकीट काढण्यासाठी येण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. (Monkey at Manmad Railway Station Nashik News)

हेही वाचा: Nashik : पाषाण मंदिरांना संवर्धनाची आस!

मनमाड जंक्शन महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक असल्याने प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. प्रवाशांची गर्दी असलेल्या स्थानकावर बुधवारी चक्क माकडाचे दर्शन झाले. तसे पाहता रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूला लोकवस्ती असल्याने वन्य प्राणी रेल्वेस्थानकावर येत नाहीत. मात्र, या माकडाच्या मागे कोणता तरी हिंस्र प्राणी लागल्यामुळे हे माकड थेट रेल्वेस्थानकात घुसले. सर्वत्र फिरत ते स्थानकाच्या टिकिट बुकिंग कार्यालयाजवळ आले आणि तेथेच रमले. माकड घाबरलेल्या अवस्थेत दिसून येत होते.

या परिसरात जाण्या- येण्यासाठी तसेच तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी असते. सुरवातीला माकड बिचकले होते. मात्र, नंतर फिरू लागले. सर्वांच्याच नजरा मर्कटलीला बघण्यात खिळल्या होत्या. नंतर त्यांच्या माकड उड्या सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आजूबाजूला मोठी गर्दी असल्याने बिचकलेले माकड प्रवाशांची तोंडे न्याहाळत होते.

त्यांच्याकडे बघून प्रवाशी त्याला खाण्यासाठी अन्न, फळे देऊ लागली. मात्र कोणाचेही अन्न, फळे न खाता माकड आजारी असावे, असे दिसत होते. रेल्वेस्थानकावर माकडाच्या लीला सुरू असताना, ते प्रवाशांना इजा पोचऊ शकते. तरीही त्याला इतरत्र नेण्यासाठी एकही अधिकारी व कर्मचारी फिरकले नाहीत.

हेही वाचा: Crop Fire Incident : शॉर्ट सर्किटमुळे 30 क्विंटल मका खाक; 3 ट्रॉली चारा खाक

टॅग्स :NashikMonkeymanmad