नाशिक- अनेक वर्षांपासून प्रलंबित गावठाण पुनर्विकास योजना राबविताना जादा एफएसआय द्यावा. तसेच, मुंबई व ठाण्याच्या धर्तीवर एसआरए योजना राबविण्याची मागणी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी बुधवारी (ता.२) विधीमंडळात केली. आमदार ढिकले यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा एसआरए स्कीम लागू करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.