गीतरामायण संगीत मैफल

गीतरामायण संगीत मैफल
Published on: 
फोटो : H34010 -- दीपोत्सवाच्या स्वागताला गीतरामायणाचा नजराणा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : यंदा गीतरामायणाला ७१ वर्षे झाली असल्याने, विविध वयोगटातील ७१ गायकांच्या स्वरांतून सुरेल गीत रामायणाची अनुभूती श्रोत्यांना घेतली. देवीगीतांनी प्रारंभ करीत स्वये श्री रामप्रभू ऐकती, शरयू तीरावरी अयोध्या, दशरथा घे हे पायसदान, सावळा ग रामचंद्र, स्वयंवर झाले सीतेचे, गा बाळांनो श्री रामायण या व इतर गाण्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नुकत्याच झालेल्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त व येणाऱ्या दीपोत्सवाच्या स्वागतासाठी गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी मोरुस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नाशिक रोड येथील मोटवाणी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात गायक नंदकुमार देशपांडे यांच्या सरगम म्युझिक अकादमीच्या ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गदिमा लिखित व बाबुजी - सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणाला यंदा ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफले गेले. तालवाद्य व स्वरसाथ अमित गुरव यांनी तर, तबल्यावर शशिकांत बाबरेकर यांनी साथसंगत केली. संजय किल्लेदार यांनी निवेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.