esakal | Positive Story : मशिदीतून मिळणार प्राणवायू!
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen

Positive Story : मशिदीतून मिळणार प्राणवायू! गरजूंना वेळीच मिळणार ऑक्सिजन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : कोरोनाची बाधा (coronavirus) होऊन मृत्यू (death) होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशातच ऑक्सिजन आणि बेडच्या तुटवड्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण आणि नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. काही दिवसांपूर्वी (nashik oxygen leak) ऑक्सिजन गळती दुर्घटना घडलेल्या डॉ. हुसैन रुग्णालयामध्ये सध्या बेडचा तुटवडा निर्माण झालाय. अशातच राष्ट्रीय एकात्मतेचे (national unity) उदाहरण आपल्या समोर येत आहे.

केवळ शंभर रुपये शुल्क

डॉ. हुसैन रुग्णालयातील बेड फुल्ल असल्याने रुग्ण वेटिंगवर आहेत. या ठिकाणी एकही बेड शिल्लक नसल्याने जुने नाशिक भागातील रुग्णांना इतरत्र शोध घ्यावा लागत आहे. यामुळे भद्रकाली, जुने नाशिक परिसरातील रुग्णांना मदत करण्यासाठी कमिटीने हा निर्णय घेतला. भद्रकाली परिसरातील शाही मशिदीतून रुग्णांना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. यामध्ये दिवसाकाठी केवळ शंभर रुपये शुल्क आकारले जाणार असून, दहा मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत. या मदतीमुळे जुने नाशिकमधील अनेक गरजवंत रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध होईल, अशी अपेक्षा कमिटीने व्यक्त केली. शाही मशिदीत मंगळवारी सायंकाळी फातेहा पठणतर्फे 'ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर'चे लोकार्पण करण्यात आले. अशा रुग्णांसाठी शरीयत बचाव कमिटीने 'ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर' देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: VIDEO : द्राक्ष नगरीत ‘रु-द्राक्ष’ची कृपा! आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे

अशी मिळेल मदत

शाही मशिदीतून सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत ही मशिन रुग्णांसाठी घेऊन जाता येईल. यासाठी कमिटीने समन्वयकांची नियुक्ती केली आहे. शाज मन्सुरी हे त्यासंदर्भातील काम पाहतील. मशिनसाठी ८४८२८७८०९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शहर-ए-खतीब यांनी केले आहे.

हेही वाचा: कोरोनामुक्त झाल्यानंतरही निष्काळजीपणा नको! हृदयविकाराचा, पक्षाघाताचा धोका