esakal | कोरोनामुक्त झाल्यानंतरही निष्काळजीपणा नको! हृदयविकाराचा, पक्षाघाताचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

कोरोनामुक्त झाल्यानंतरही निष्काळजीपणा नको! हृदयविकाराचा, पक्षाघाताचा धोका

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : गेल्या काही महिन्यात शहरात अचानक चक्कर येऊन मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहे. त्यामागे रेमडेसिव्हिरसारख्या (remdesivir) इंजेक्शनचा अतिवापर, कोरोना मुक्त (coronavirus) झाल्यानंतरही निष्काळजीपणा होत असल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन हृदयविकाराचा, पक्षाघाताचा तीव्र हृदयविकाराचा, पक्षाघाताचा तीव्र झटका हे मृत्यूचे (death) कारण ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ( No negligence even after corona free)

वैद्यकीय विभागाची निरीक्षणे

कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारानंतर काही दिवसांनी चक्कर येऊन मृत्यू झाल्याच्या घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चक्कर येऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या शंभरच्यावर पोचली आहे. यामागच्या कारणांचा शोध वैद्यकीय विभागाकडून घेताना काही निरीक्षणे नोंदविली. कोरोना संसर्गानंतर काही दिवसांनी कोविडचे विषाणू मरतात. त्या विषाणूंचे जे आवरण असते, त्या आवरणाला मानवी शरीर सामावून घेत नसल्याने रक्तवाहिन्यांमध्ये आवरण प्रवाहित होते. कालांतराने विषाणूंची आवरणे रक्तात वाहताना एकत्र जमतात. त्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या गुठळ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहत जातात व कुठल्यातरी भागात अडकतात. रक्तवाहिन्यांमध्ये अडकून पडलेल्या विषाणूंच्या आवरणांमुळे रक्तप्रवाह थांबतो व अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येतो.

हेही वाचा: धक्कादायक! पोलिस असल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये जबरदस्ती प्रवेश

मेंदूत अडकल्यास झटका

मेंदूत अडकल्यास पक्षाघाताचा तीव्र झटका येतो. त्यामुळे चक्कर येऊन व्यक्ती मृत पावते. कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतरही सहा महिन्यांनी अशाप्रकारे अकाली मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. रक्तवाहिन्यांची लवचिकता वयाच्या चाळीशीनंतर कमी होत जाते. बदललेली जीवनशैली, आनुवंशिकता, तसेच जेनेटिक रचनेतील बदलची कारणे त्यामागे आहेत. ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. ३० ते ५० वयोगटात रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा तयार होत असल्याने हृदयात किंवा मेंदूत रक्ताची गुठळी अडकून मृत्यू होतो.

हेही वाचा: धक्कादायक! चांदवडला रेमडेसिव्हिर ऐवजी भुलेच्या इंजेक्शनची विक्री

५० वर्षे वयोगटात मृत्यूचे प्रमाण कमी

५० वर्षावरील रुग्णांमध्ये मुख्य रक्तवाहिनी ब्लॉक झाली, तरी केशवाहिन्यांचे जाळे तयार झाले असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी अडकली, तरी शरीरातील रक्तप्रवाहाचे काम थांबत नाही. त्यामुळे ५० वर्षे वयोगटात या कारणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. ३० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये अशा प्रकारचे केशवाहिन्यांचे जाळे तयार झालेले नसते. असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

-

हे देखील चक्कर येण्याचे कारण

कोरोना रुग्णांना मधुमेह, थायरॉईड, कॅन्सर, किडनी आदी प्रकारचे गंभीर आजार असतात. नियमित तपासणी होत नसल्याने अंदाज नसतो. काम करताना संसर्गाबद्दल अनभिज्ञता असते रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्याने (हायपोरिया) तसेच उभे राहून काम केल्याने (हायपोटेन्शन) मुळे रुग्ण शॉक स्टेटसमध्ये जाऊन जागीच कोसळतो व मृत्यू होतअसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर काळजी घेणे गरजेचे आहे. विषाणूंच्या आवरणामुळे रक्तात गुठळी तयार होते. परिणामी हृदयविकार, पक्षाघाताचा तीव्र झटका येतो, त्यात मृत्यू होतो. या बाबी टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त पातळ होण्यासाठी आवश्यक औषधे, इंजेक्शन घेणे गरजेचे आहे. - डॉ. कल्पना कुटे, बालरोगतज्ज्ञ, संचालक, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका.

loading image