
सातपूर (जि. नाशिक) : घंटागाडीतील भंगार मला का विकत नाही, या कारणावरून श्रमिकनगर येथील एका भंगार व्यावसायिकाकडून घंटागाडी कर्मचाऱ्याला दोन दिवसापासून मारहाण होत असून, पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (ghantagadi worker brutally beaten by scrap dealer Nashik crime Latest marathi news)
घंटागाडी चालक म्हणून काम करणाऱ्या चेतन भुजबळ यास दोन दिवसापासून भंगार व्यावसायिकाकडून मारहाण होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गाडीतील भंगार का विकत नाही या कारणाने मारहाण होत आहे.
भंगार दिले नाही तर कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी या भंगार व्यवसायिकाने दिली आहे. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या भंगार व्यवसायिकावर कारवाई करण्याची मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
बुधवारी (ता. २) सकाळी चेतन भुजबळ हे ड्यूटीवर हजर होण्यासाठी जात असताना भुजबळ यांना चार जणांच्या टोळक्याने मारहाण केली. दरम्यान मनपा प्रशासन व घंटागाडी ठेकेदार या प्रकरणाकडे लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.