Dhule : आज गुलाबपुष्प; नंतर मात्र बांगड्यांचा आहेर

Councilor Fatema Ansari, dr. Sarfraz Ansari and other citizens during agitation
Councilor Fatema Ansari, dr. Sarfraz Ansari and other citizens during agitationesakal

धुळे : प्रभागातील अनियमित पाणीपुरवठाप्रश्‍नी वारंवार मागणी करुनही समस्या सुटत नसल्याने प्रभाग-१२ च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने प्रभागातील काही नागरिकांसह महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर हातात गुलाबपुष्प घेऊन गांधीगिरी केली. दरम्यान, यानंतरही समस्या न सुटल्यास आयुक्तांना बांगड्यांचा आहेर देण्याचा इशाराही त्यांनी दिला. (Samajwadi Party corporator with some citizens carried out Gandhigiri outside municipal commissioner hall with rose flowers dhule news)

शहरातील प्रभाग क्रमांक-११, १२ व १९ मध्ये अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न आहे. या भागात दहा-बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे ही समस्या सोडवावी अशी मागणी नगरसेविका फातेमाबी अन्सारी, डॉ. सर्फराज अन्सारी यांनी केली होती. याप्रश्‍नी त्यांनी १८ जुलैला महापालिकेत आंदोलनही केले होते.

दहा-बारा दिवसाआड पाणीपुरवठा होतो याच्या निषेधार्थ प्रतीकात्मक पादत्रांचा हार त्यांनी आणला होता. याचवेळी शहराच्या देवपूर भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो, त्याबद्दल अधिकाऱ्यांच्या सत्कारासाठी त्यांनी गुलाबपुष्पही सोबत आणले होते.

Councilor Fatema Ansari, dr. Sarfraz Ansari and other citizens during agitation
धुळे जिल्ह्यात ‘शाबास गुरुजी’चा बोलबाला

दरम्यान, समस्या सुटत नसल्याने नगरसेविका फातेमा अन्सारी, डॉ. अन्सारी यांच्यासह काही नागरिक बुधवारी (ता.३) महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर गुलाबपुष्प घेऊन उभे ठाकले. महासभा असल्याने मात्र आंदोलनकर्ते व आयुक्त देविदास टेकाळे व इतर अधिकाऱ्यांची भेट झाली नाही.

दरम्यान, या आंदोलनाबाबत माहिती मिळाल्यानंतर आयुक्त श्री. टेकाळे यांनी डॉ. अन्सारी यांच्याशी संपर्क साधल्याचे समजले. या आंदोलनात सुलताना शेख, जमिला शेख, अफजुलुन्निसा, सुरैय्या बी, अख्तरुन्निसा, मलिका बी, फहिमिदा, अफजलिया, आरीफ अन्सारी आदींचाही सहभाग होता.

Councilor Fatema Ansari, dr. Sarfraz Ansari and other citizens during agitation
नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात महाराष्ट्र अव्वलस्थानी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com