इगतपुरी तालुक्यात खळबळ : सरपंचाचे पद धोक्यात.. कुणबी जातीचा दावा अवैध

mandakini godse.jpg
mandakini godse.jpg

नाशिक / अस्वली स्टेशन : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातीचे जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. 

तालुक्यात चर्चेला उधाण

माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांच्या विरोधात जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. वर्षभरापासून अनेकदा झालेल्या सुनावण्यांद्वारे दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी देण्यात आली होती. नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांच्या त्रिसदस्यीय समितीने थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या जातीचा दावा अवैध ठरविला. दरम्यान ह्या आदेशामुळे घोटी खुर्दच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांना पदच्युत व्हावे लागणार आहे. थेट सरपंचपदावरच गंडांतर आल्याने पुन्हा निवडणुक होईल की सदस्यांमधून सरपंच निवडला जाईल ह्याबाबत इगतपुरी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. 

सरपंचपद रद्द करण्याची कार्यवाही
घोटी खुर्द येथील मंदाकिनी गोडसे यांनी इतर मागास प्रवर्गातील हिंदू कुणबी जातीच्या दाखल्यावर थेट सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. गोडसे यांनी नामनिर्देशन पत्र भरताना कुणबी जातीचे नसतांना खोटे पुरावे, खोटे प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र सादर केले होते. याबाबत सूनावण्या होऊन नाशिकच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंदाकिनी गोडसे यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. यासह त्यांचा कुणबी जातीचा दावा अवैध ठरवल्याचा आदेश पारित केला आहे. ह्या आदेशामुळे मंदाकिनी गोडसे यांचे थेट सरपंचपद रद्द करण्याची कार्यवाही नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे.

जातीचा दावा अवैध ठरवण्याचा आदेश

मंदाकिनी गोडसे यांनी जात प्रमाणपत्र काढतांना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तींच्या जातीच्या  पुराव्यांचा गैरवापर केला होता. याबाबत तक्रारदार माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी भक्कम पुरावे सादर केले होते. नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांनी संयुक्तपणे आदेश पारित करून मंदाकिनी गोडसे यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून जातीचा दावा अवैध ठरवण्याचा आदेश पारित केला आहे. आदेशाच्या प्रती नाशिकचे जिल्हाधिकारी, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी, इगतपुरीचे तहसीलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदाकिनी गोडसे यांचे थेट सरपंचपद काढण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे समजते. 

निवडणुकीवेळी थेट सरपंच पदासाठी मतदान
इगतपुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांना आता पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. मंदाकिनी गोडसे यांचे पती विष्णू गोडसे यांनी ह्या प्रकरणी प्रतिष्ठेचा विषय करून समितीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अशी माहिती आत्माराम फोकणे यांनी दिली. निवडणुकीवेळी थेट सरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले होते. आता सरपंचपदावरून गोडसे यांना पदच्युत व्हावे लागणार आहे. आता पुन्हा थेट सरपंच निवडणूक होणार की निवडून आलेल्या सदस्यांतून सरपंच निवडला जाणार ह्याकडे इगतपुरी तालुक्याचे विशेष लक्ष लागले आहे.

खटाटोप समितीने व्यर्थ ठरवला
"प्रांताधिकाऱ्यांची दिशाभूल करून मंदाकिनी गोडसे यांनी कुणबी जातीचा दाखला घेतला होता. यासह अर्थबळाच्या जोरावर जातीचे प्रमाणपत्र वैध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांना वेठीस धरले होते. मात्र त्यांचा खटाटोप समितीने व्यर्थ ठरवला. माझ्याकडील भक्कम पुराव्यांच्या बळावर न्यायदेवतेने मंदाकिनी गोडसे यांचे पितळ उघडे पाडले. हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे असे मी समजतो.- आत्माराम फोकणे, तक्रारदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com