Ghoti Market Committee Election Result : घोटीत शेतकरी विकास पॅनलची सत्ता! परिवर्तन पॅनलला 2 जागा

 Election
Election esakal

Ghoti Market Committee Election Result : घोटी बाजार समिती निवडणुकीत लोकनेते (स्व) गोपाळराव गुळवे प्रणीत शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले. (Ghoti Market Committee Election Result Ghoti shetkari vikas Panel in power nashik news)

लोकनेते (स्व) गोपाळराव गुळवे प्रणीत शेतकरी विकास पॅनल नेतृत्व काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी केले. सोसायटी सर्वसाधारण गटातून निवृत्ती जाधव,

सुनील जाधव, शिवाजी शिरसाठ, हरिदास लोहकरे, अर्जुन पोरजे, रमेश जाधव, भाऊसाहेब कडभाने, महिला राखीव गटातून सुनीता गुळवे, आशा खातळे, ओबीसी गटातून राजाराम धोंगडे, व्हीजेएनटी गटातून ज्ञानेश्वर लहाने, व्यापारी गटातून भरत आरोटे, नंदलाल पिचा तर हमाल गटातून रमेश जाधव विजयी झाले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 Election
APMC Election: बाजार समितीच्या मतमोजणीवेळी राडा; माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार यांच्यात हाणामारी video

तर (स्व) रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार दिलीप चौधरी विजयी झाले. मात्र एका जागेसाठी फेरमोजणीचा अर्ज आल्याने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी जैन भवन येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

 Election
Dindori Market Committee Election: दिंडोरी बाजार समितीत परिवर्तन! शेतकरी उत्कर्ष पॅनलला 5 जागा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com