Revenue Department
sakal
घोटी: इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनधिकृतरीत्या बदल करून इमारतीचा हॉटेल/ रिसॉर्ट/टूरिस्ट होम/लॉजिंग व रेस्टॉरंट म्हणून वापर करणाऱ्या अनधिकृत व्यावसायिकांविरोधात महसूल प्रशासनाने ‘ऑपरेशन व्ही’अंतर्गत मोठी कारवाई केली. या मोहिमेत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या व्हिला व बंगल्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यात १२ जणांना नोटिसा देण्यात आल्या.