येवला: ‘गीरगायीचे दूध दोनशे रुपये आणि तूप तीन हजार रुपये लिटर विकले जाते’ हे ऐकले होते; पण त्याच पवित्रतेच्या प्रतीक असलेल्या गीरगायीच्या ‘शेणापासून मूर्ती साकारल्या जातात’, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे अशक्य वाटणारे शक्य करून दाखवले आहे येवला तालुक्यातील वडगाव येथील कापसे फाउंडेशनने!