Crime
sakal
नाशिक: गिरणारे शिवारातील हरसूल-गिरणारे रोडने अवैधरीत्या विदेशी मद्याची चारचाकी कारमधून तस्करी होत असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत पथकाने कारसह मद्यसाठा असा सुमारे पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.