AI generated photos of Girish Mahajan
esakal
नाशिक : ‘‘समाज माध्यमांवर गेल्या काही दिवसांत चुकीच्या पद्धतीने व कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून तयार केलेली माझ्याविषयीची छायाचित्रे व्हायरल केली जात आहेत. मात्र छायाचित्रातील ती माझ्या मित्राची मुलगी असून, तिचे वडील हयात नसल्याने तिचे लग्न जमविण्याची जबाबदारी पालक म्हणून माझ्यावर आहे,’’ अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी पत्रकार परिषद (Girish Mahajan press conference latest news) घेताना दिली.