Girish Mahajan
sakal
जळगाव: राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांचे वर्षभरातील ३१ लाख १८ हजार २८६ रुपये एवढे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे. त्याबाबतचा धनादेश व संमतिपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी (ता. ७) मंत्रिमंडळ बैठकीप्रसंगी सुपूर्द केले.