Girish Mahajan
sakal
नाशिक: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ओला दुष्काळ जाहीर नाही, परंतु ओल्या दुष्काळा एवढीच मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. यासंदर्भात एक-दोन दिवसात निर्णय घेतला जाईल अशी माहिती जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतासाठी आहेच, परंतु सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कंपन्या व स्वयंसेवी संस्थांनीदेखील पुढे यावे असे आवाहन महाजन यांनी केले.