Girish Mahajan
sakal
नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आग्रही आहेत. दिल्लीतूनही तसे स्पष्ट आदेश आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपमध्ये सुरू असलेल्या प्रवेशामागे महायुतीतील घटकपक्षांना शह देण्याचा कोणताही हेतू नाही, उलट यामुळे महायुतीच बळकट होईल, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.