What did Girish Mahajan say about Gokul Gite?
esakal
नाशिक : विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी लढविणाऱ्या गोकुळ गितेंनी माघार घेतल्यामागे राजकीय ओढाताण आणि समजुतीचा भाग असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट (Girish Mahajan on Gokul Gite withdrawal) केले. नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीबाबत सुरुवातीला काही नाराजी होती. त्यामुळे माघारीसाठी प्रयत्न करावे लागले. गिते निवडणुकीत कायम राहिले असते, तर पराभवाची जबाबदारी माझ्यावर आली असती, अशी कबुली महाजनांनी पत्रकार परिषदेत दिली.