Girish Mahajan
sakal
नाशिक: साधू-महंत गांजा पितात, त्यासाठी सरकार त्यांना पैसे देते, असे म्हणणे चूक आहे. साधू-महंतांचा सोशल मीडियावरील अपप्रचार आम्ही सहन करणार नाही. कोणीही सोम्या-गोम्या काहीही बोलले ते आम्ही सहन नाही. जो कोणी अशा प्रकारचे वक्तव्य करेल, त्याच्यावर पोलिस कारवाई केली जाईल. असा इशारा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. हा शहरी नक्षलवादाचाच प्रकार असून पोलिस आयुक्तांकडे तक्रारही केल्याची माहिती त्यांनी मंगळवारी (ता. १६) दिली.