Inspirational News : कल्याणीच्या कष्ट, मेहनत अन जिद्दीचे झाले कल्याण! कुटूंबियांसह ग्रामस्थांचा जल्लोष..

Newly elected Police Kalyani with her family
Newly elected Police Kalyani with her family esakal

Nashik News : घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलांना शिकवावे कसे आणि पोटाची खळगी भागवावी असा प्रश्न ज्या कुटुंबाला सतत पडलेला असायचा त्याच कुटुंबातील मुलगी आज पोलिस कर्मचारी झाली. (girl from an ordinary family worked hard and become police officer chandori nashik news)

बाबा मला एक संधी द्या असं म्हणत एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी कठोर परिश्रम करत पोलिस कर्मचारी बनली. यामुळे कुटूंबियांसह ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला.

चौघांचे छोटे कुटुंब, त्यात वडील अशोक स्थानिक दूध संस्थेत सकाळी काम व त्यानंतर परंपरागत लोहार काम, आईचे शिवणकाम, त्यातून येणाऱ्या पैशातून घराला हातबार, भाऊ सूरजचा फ्लेक्सचा व्यवसाय उभा करताना व आपला शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी होणारी आईवडिलांची धडपड हे सर्व बघवत नव्हते.

ही परिस्थिती बदलावयाची असेल तर आपल्याला अभ्यास करून मोठे व्हावे लागेल अशी जिद्द, चिकाटी अन कठोर मेहनत उराशी बाळगून चांदोरी येथील कल्याणी अशोक आहेर या लेकीने महाराष्ट्र पोलिसांच्या मीरा भाईंदर येथील परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिच्या या यशामुळे आईवडिलांसह भावाचा उर भरून आला असून आयुष्य सार्थकी लागल्याचे ते मोठ्या भावनेने सांगत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Newly elected Police Kalyani with her family
Nashik News : सह्याद्री फार्म्सकडून कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे समभाग; कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ!

चांदोरी गावात अशोक आहेर व वनिता आहेर हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. लोहार काम अन शिवणकाम यातून येणाऱ्या कमी अधिक उत्पन्नातून आहेर दांपत्य घरखर्च व मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवित असत. या गरीब परिस्थितीत आईवडिलांची होणारी घालमेल बघता त्यांची लेक कल्याणी हिने ही परिस्थिती बदलवण्याचा निश्चय खेळण्या बागडण्याच्या वयातच केला.

अंगी जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत अन् हुशारीच्या जोरावर तिने १२ वी पर्यंतचे शिक्षण गावातच रयतच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर मनाशी खूण गाठ बांधत नाशिक येथे अँकेडमीमध्ये पोलिस भरतीचे प्रयत्न सुरू करत स्वप्न पूर्णत्वाचा दिशेने प्रयत्न सुरू केले.

दोन वर्षे कोविडच्या कालखंडात कोणत्याही प्रकारची भरती झाली नाही. या वर्षी जानेवारी २३ मध्ये झालेल्या भरतीचा निकाल ११ एप्रिलला जाहीर झाला. त्यामध्ये आपलं नाव आल्याचे कळताच कुटुंबियांना आनंदाची बातमी तिने दिली.

"आई वडिलांचे कष्ट, भावाचे प्रोत्साहन यामुळे मला प्रेरणा मिळाली. आजच्या या निकालातून निश्चित समाधान असेल." - कल्याणी आहेर, चांदोरी

Newly elected Police Kalyani with her family
Nashik News : राज्यात आकांक्षित शहरात जिल्ह्यातील 3 शहर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com