Crime Update : आई-बापाला मारण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार | Nashik Latest crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raped on girl Nashik latest Crime News

Crime Update : आई-बापाला मारण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार

नाशिक : आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत नराधमाने अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार (rape) केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात ठाण्यात संशयिताविरोधात बलात्कार व पोस्कोअंतर्गत (Pocso) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Girl raped by threatening to kill her parents Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयिताला पोलिस कोठडी

मजहर अन्वय खान असे संशयित नराधमाचे नाव आहे. अंबड शिवारातील वरचे चुंचाळे परिसरात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मजहर खान याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडलांना ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर तिला त्र्यंबकेश्‍वर रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन गेल्या २ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान बलात्कार केला. सदरील प्रकार दोन महिन्यांनी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी अंबड पोलिसात पीडितेच्या पालकांनी धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार, बलात्कार आणि पोस्का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime : 2 लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक

Web Title: Girl Raped By Threatening To Kill Her Parents Nashik Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..