

Girls Higher Education : तैनवाला फाउंडेशनचे रमेश तैनवाला व त्यांच्या पत्नी शोभा तैनवाला यांच्या संकल्पनेतून तैनवाला फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना बिनव्याजी अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
तैनवाला फाउंडेशनने शैक्षणिक कर्जाला पर्याय म्हणून मागील नऊ वर्षात उपक्रमातंर्गत आजवर १३० हून अधिक मुलींना उच्च शिक्षण मिळवून देत स्वतःच्या पायावर उभे केले. यंदा हा उपक्रम राबवला जाईल. त्यातंर्गत जिल्ह्यातील १० मुलींचे पालकत्व घेतले जाईल. (Girls Higher Education Interest free financial assistance by Tainwala Foundation for higher education of girls Nashik)
गुणवत्ता, उच्च शिक्षणाची व करिअर करण्याची तीव्र इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा मुलींसमोर पर्याय उरतो तो म्हणजे, शैक्षणिक कर्ज घेण्याचा. परंतु त्यातही अवाजवी व्याजदरामुळे त्यांना आपल्या करिअरकडे पाठ फिरवावी लागते.
बारावी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, नर्सिंग, बी. टेक, आर्किटेक्चर, सी.ए, बी. फार्मसी, बी.एड. यासारख्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या जिल्ह्यातील मुलींचे स्वीकारले जाणार आहे. शिक्षणासाठी अर्थसाहाय्य म्हणून घेतलेल्या रकमेची परतफेड मुलींनी शिक्षण पूर्ण करून रोजगार मिळविल्यावर करावयाची आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीस बारावी परीक्षेत किमान ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावी. विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ३ लाखांपेखा अधिक नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. उपक्रमाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी ९८८१०९६३१६ अथवा ८६००००३४६० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.