Farmer Scheme: शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना! पात्र शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण करावे

 farmers schemes
farmers schemesesakal
Updated on

Farmer Scheme : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांनी १५ जूनपर्यंत आधार प्रमाणिकरणासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, ई सेवा केंद्रावर किंवा बँक शाखेशी संपर्क करून तातडीने संपर्क साधून आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी केले आहे. (Farmers Debt Relief Scheme Eligible farmers should do Aadhaar authentication by June 15 nashik news)

या योजनेअंतर्गत नियमीत पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेतलेला आहे.

या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार मर्यादेपर्यंत या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड केलेली आहे.

त्यापैकी या योजनेस पात्र १ हजार ५२६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही झालेले नाही. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, ई सेवा केंद्र किंवा बँक शाखेशी तातडीने संपर्क करून आपले आधार प्रमाणीकरण १५ जूनपर्यंत पूर्ण करून घ्यावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 farmers schemes
Nashik ZP Funding: आरोग्य कर्मचारी हजेरी यंत्रणेसाठी जि.प. सेसमधून 9 लाख

आधार प्रमाणीकरणा अभावी प्रोत्साहन योजनेच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी हे आवाहन करण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेतील जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड केलेली आहे, त्यापैकी पात्र ४७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणकरणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी केले आहे.

 farmers schemes
Nashik: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनाची योजना; शेतकऱ्यांनी येथे करावे अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com