Girna Dam
sakal
मालेगाव: उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असलेल्या गिरणा धरणातून मालेगाव तालुक्यातील सात गावांना कायमस्वरुपी दोन आवर्तने मंजूर झाली आहेत. गिरणा धरणाच्या पांझण डाव्या कालव्यांतर्गत कळवाडी, देवघट, साकुर, नरडाणे, उंबरदे, चिंचगव्हाण व दापुरे या सात गावांना पाणी आवर्तनास शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे या भागाला यापुढे कायमस्वरुपी आवर्तनाच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे.