Bakri Eid 2023: रिमझिम सरीत सामाजिक सलोख्याचे दर्शन! मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद उत्साहात

Bakri Eid 2023
Bakri Eid 2023esakal

Bakri Eid 2023 : रिमझिम सरीत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. गोल्फ क्लब ईदगाह मैदान येथे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली ईदची सामुदायिक नमाजपठण झाली.

शहरासह देशात सुख शांती आणि धार्मिक सामाजिक एकोपा नांदो. अशी दुआ करण्यात आली. (glimpse of social harmony in monsoon rain drizzle Bakri Eid 2023 from Muslim brothers in spirit nashik)

गोल्फ क्लब ईदगाह मैदान येथे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली ईदची सामुदायिक नमाजपठण झाली
गोल्फ क्लब ईदगाह मैदान येथे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली ईदची सामुदायिक नमाजपठण झालीesakal

गुरुवारी (ता.२९) सकाळी दहाच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाजपठण केली. खुदबा पठण करण्यात आला. त्यानंतर फातिया पठण झाले. सलाम पठण करून ईदच्या नमाजाची सांगता झाली.

दरम्यान शहरासह देशात सुखशांती आणि धार्मिक सामाजिक एकोपा नांदो, शहर तसेच देशावरील संकट दूर होवो, अशी दुआ करण्यात आली. नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, माजी महापौर दशरथ पाटील यांनी शहर-ए- खतीब यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

शहरातील जुने नाशिक, वडाळा रोड, वडाळा गाव, नाशिक रोड, देवळाली, सातपूर अशा विविध भागातील सुमारे ६० मशिदीमध्येही मौलवीच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांकडून ईदची नमाजपठण केली.

पोलिस विभागाकडून ईदगाह मैदानसह परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरातील इमारतीवरून शस्त्रधारी पोलिस दुर्बींनच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाची टेहेळणी करत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bakri Eid 2023
Bakri Eid : मटन शिजवताना फॉलो करा या 3 टिप्स, बनेल परफेक्ट

नमाज दरम्यान काही प्रमाणात पाऊस झाला. पावसातही मुस्लिम बांधवांनी एकाच ठिकाणी थांबून नमाजपठण व अन्य विधी पूर्ण केले. सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे.

सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत कुर्बानीचा धार्मिक विधी संपन्न करावा. सर्वत्र शांतता राखावी. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. एकमेकांमध्ये सलोखा राखावा, असे आवाहन शहर-ए-खतीब यांनी केले.

नायजेरियन युवकांची उपस्थिती

ईदगाह मैदानावर गुरुवारी बकरी ईदची सामुदायिक नमाज झाली. शहराच्या विविध भागातील हजारो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावत ईदची नमाजपठण केली. चार ते पाच नायजेरियन युवकांनीही उपस्थिती लावत नमाजपठण केली.

नमाजाची सांगता होताच मुस्लिम युवकांनी त्यांच्याबरोबर सेल्फी तसेच छायाचित्र काढून आपली आठवण जतन केली. नायजेरियन युवकांनीही याठिकाणी सर्वांबरोबर नमाजपठण केल्याचा आनंद व्यक्त केला.

Bakri Eid 2023
Bakri Eid 2023 : मालेगावला 10 हजार बोकड्यांची विक्री; नमाज पठणानंतर पूर्व भागात कुर्बानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com